मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये

काही महत्त्वाची मार्गदर्शक तत्त्वे

views

3:25
काही महत्त्वाची मार्गदर्शक तत्त्वे: मुलांनो, आता आपण काही मार्गदर्शक तत्त्वे पाहणार आहोत: १. शासनाने उपजीविकेचे साधन सर्वांना उपलब्ध करून दयावे. स्त्री-पुरुष असा भेदभाव करू नये. मुलांनो, उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देणे म्हणजे प्रत्येक हाताला काही ना काही तरी काम मिळवून देणे होय. २. राष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणांचे म्हणजेच स्मारके, वास्तू यांचे संरक्षण करावे. ३. वृद्धापकाळ, अपंगत्व, बेकारी यांपासून नागरिकांचे संरक्षण करावे. ४. भारतातील सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा करावा. मुलांनो, शासनाने विद्यार्थ्यांसाठी बऱ्याच योजना राबविल्या आहेत. पण तरीही अजूनही काही गरजू मुले शिक्षणापासून वंचित आहेत. म्हणून शासनाने सर्व विद्यार्थ्यांना जात पाहून आरक्षण न देता फक्त आर्थिक निकषांवर आरक्षण दयावे. त्यामुळे जी मुले खरोखर शिक्षण घेऊ शकत नाहीत त्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील.