मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये

मूलभूत कर्तव्ये

views

5:49
मूलभूत कर्तव्ये: मुलांनो, लोकशाहीत नागरिकांना दुहेरी जबाबदारी पार पाडावी लागते. नागरिकांना एकीकडे आपल्या हक्कांवर गदा येणार नाही याची काळजी घ्यावी लागते तर दुसरीकडे त्यांना काही मूलभूत कर्तव्ये आणि जबाबदाऱ्याही पार पाडाव्या लागतात. भारतातील सर्व नागरिकांचे कल्याण व्हावे यासाठी संविधानाने मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत ती कर्तव्ये प्रत्येक नागरिकाने पार पाडणे सक्तीचे आहे. तर आता आपण पाहूया भारतीय नागरिकांची काही मूलभूत कर्तव्ये: १. प्रत्येक नागरिकाने संविधानाचे पालन करावे: संविधानातील आदर्श भारताचा ध्वज व राष्ट्रगीताचा सन्मान प्रत्यके भारतीय नागरिकाने केलाच पाहिजे. २. स्वातंत्र्याच्या चळवळीला प्रेरणा देणाऱ्या आदर्शांचे पालन करावे. दीडशे वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी अनेक स्वातंत्र्य वीरांनी आपल्या प्राण्यांची आहुती दिली. अशा स्वातंत्र्यवीरांचा सन्मान राखणे, चळवळीला प्रेरणा देणाऱ्या आदर्शांचे पालन करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकांचे कर्तव्य आहे.