मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये

चर्चा

views

3:46
चर्चा: मुलांनो, ही मुले, त्यांच्या परिसरातील विविध प्रकारच्या प्रदूषणाबद्दल चर्चा करत आहेत. आपण त्यांची चर्चा ऐकूया. रोहन : आपल्या गावातील नदी ही नदी वाटतच नाही. केवढा तो प्लास्टिकचा कचरा ! मला कोणी सांगितले तरी आता मी नदीत कचरा टाकणार नाही. साहील: ते ठीक आहे, पण कानठळ्या बसवणाऱ्या त्या आवाजांचे काय करायचे? राहुल: नागरिक म्हणून आपल्या जबाबदाऱ्यांबाबतही आपण आग्रह धरला पाहिजे. महेश: सण उत्सव साजरे करताना याचे भानच राहत नाही लोकांना! राकेश: आपल्या देशाच्या साधनसंपत्तीचे आणि सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. या शेवटच्या प्रकरणांमध्ये आपण भारतीय संविधांनाची पूर्ण माहिती करून घेतली. संविधांनाची उद्दिष्टे काय आहेत. त्यांची वैशिष्टये याची ओळख करून घेतली. संविधानाची निर्मिती कशी झाली नागरिकांचे हक्क कोणते, त्यांनी कोणती कर्तव्ये पार पाडवयाची आहेत, या सर्व गोष्टींची माहिती आपण या पाठात घेतली आहे. भारताचा सुजाण नागरिक म्हणून या सर्व कर्तव्यांचे आपण सर्वांनी पालन केले पाहिजे.