मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये

सूची तयार करा

views

3:47
सूची तयार करा: मुलांनो, आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो, त्यांची उत्तरे द्या. मला सांगा घरात तुम्ही कोणते हक्क मागता आणि कोणती कर्तव्ये तुम्ही पार पाडता? मुलांनो, आता ही चित्रे पाहा या चित्रांमध्ये कोणत्या कर्तव्याचे पालन होत नाही ते आपण पाहूया. चित्र 1) पाहा, पहिल्या चित्रात मुलगा वास्तूवर नाव टाकताना दिसत आहे. या चित्रामध्ये हा मुलगा चुकीची गोष्ट करत आहे. कारण ऐतिहासिक वास्तू या आपल्या संस्कृतीचा वारसा आहेत आणि अशा ऐतिहासिक वारशाचे जतन करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. मुलाच्या लिहिण्यामुळे वास्तू खराब होते आहे. आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशाचे जतन करावे या कर्तव्याचे पालन येथे होत नाही.