पायथागोरसचा सिद्धान्त

काटकोन त्रिकोण

views

2:35
काटकोन त्रिकोण: मुलांनो, आतापर्यंत आपण विविध भौमितिक आकार, आकृत्या, रचना यांचा अभ्यास केला. त्याचप्रमाणे त्रिकोण, चौकोन, आयत यांसारख्या आकृत्यांचे प्रकार आणि गुणधर्म यांचा देखील अभ्यास केला आहे. आता आपण या सर्व घटकांची पुन्हा एकदा थोडी उजळणी करूया. ज्या त्रिकोणाचा एक कोन काटकोन म्हणजेच 90o चा असतो त्या त्रिकोणाला ‘काटकोन त्रिकोण’ असे म्हणतात. आणि काटकोनाच्या समोरच्या बाजूला कर्ण असे म्हणतात. तसेच काटकोनातील एका बाजूला उंची आणि दुसऱ्या बाजूला पाया असे म्हणतात.