पायथागोरसचा सिद्धान्त Go Back उदाहरणे1: views 4:10 उदाहरणे: उदा.1) पायथागोरसच्या सिद्धान्तानुसार काटकोन त्रिकोणाच्या दोन बाजू दिल्या असता तिसरी बाजू कशी काढतात ते आता आपण या उदाहरणाद्वारे पाहूया. काटकोन त्रिकोणात दोन बाजू दिल्या आहेत. आणि कर्णाची लांबी काढायची आहे. पायथागोरसच्या सिद्धान्ताचा वापर करून आपण उदाहरण सोडवू. (कर्ण)2 = (पाया )2 + (उंची)2 = AB2 = AC2 + BC2 AB2 = ( 5 )2 + ( 12 )2 (सूत्रात किमती लिहिल्या). AB2 = 25 + 144 (वर्ग करून घेतले). AB2 = 169 म्हणून AB = 13 सेमी. म्हणून रेख AB म्हणजेच कर्णाची लांबी 13 सेमी आहे. अशा प्रकारची उदाहरणे सोडवताना आपल्याला 1 ते 30 अंकांपर्यंतचे वर्ग आणि त्यांचे वर्गमूळ माहीत असणे आवश्यक आहे. अशाच प्रकारे आपण काही उदाहरणे सोडवली आहेत ते पाहूया. काटकोन त्रिकोण पायथागोरसचा सिद्धान्त उदाहरणे1: पायथागोरसचे त्रिकूट