पायथागोरसचा सिद्धान्त

पायथागोरसचा सिद्धान्त

views

5:51
पायथागोरसचा सिद्धान्त: मुलांनो, आता आपण थोर ग्रीक गणितीतज्ञ पायथागोरसची माहिती करून घेऊया. पायथागोरस हे एक प्राचीन ग्रीक गणिती होते. त्यांचा जन्म इ.स.वी.पूर्व 570 मध्ये सामोस बेटावर झाला होता. गणित विषयातील त्यांचे योगदान खूप मोठे आहे. गणित शिकवण्याची त्यांची हातोटी विलक्षण लोकप्रिय होती. काटकोन त्रिकोणासंबंधीचा एक सिद्धांत फार वर्षांपूर्वी पासून अनेक देशांतील लोकांना माहीत होता. भारतातील शुल्वसूत्र या ग्रंथातही तो आहे. त्या सिदधान्ताची सिद्धता प्रथम पायथागोरसने दिली म्हणून त्यांचे नाव त्या सिदधान्ताला दिले गेले. त्यांनी असे सिद्ध केले की काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेइतका असतो.