पायथागोरसचा सिद्धान्त

पायथागोरसचे त्रिकूट

views

5:08
पायथागोरसचे त्रिकूट: मुलांनो, आता आपण पायथागोरसचे त्रिकूट म्हणजे काय ते समजून घेऊया. नैसर्गिक संख्यांच्या त्रिकूटामध्ये जर मोठया संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गाच्या बेरजेइतका असेल तर त्याला पायथागोरसचे त्रिकूट असे म्हणतात. ज्या त्रिकोणांच्या भुजांची लांबी अशा त्रिकूटातील संख्यांनी दर्शवली जाते तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो. हे समजण्यासाठी आपण पायथागोरसच्या त्रिकुटाची काही उदाहरणे सोडवूयात. उदा:1) पाहा मुलांनो, (7,24,25) हा संख्या समूह पायथागोरसचे त्रिकुट आहे का हे कसे ओळखायचे ! उत्तर: या उदाहरणात 7, 24, 25 यांच्यापैकी 25 ही सर्वात मोठी संख्या आहे. सर्वात आधी आपण दिलेल्या सर्व संख्यांचा वर्ग काढून घेऊया. जसे 72=49, 242= 576 आणि 252= 625 आहे. आता पहिल्या दोन संख्याच्या वर्गांची बेरीज करून घेऊ. 49+ 576 = 625 हे उत्तर मिळाले. पाहिलंत 625 हा 25 चा वर्ग आहे. म्हणून (72) + (242) = (252) असतो. याचाच अर्थ असा होतो की, मोठया संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गाच्या बेरजेइतका आहे. म्हणून 7,24,25 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. आणि ही लांबी असणारा त्रिकोण हा काटकोन त्रिकोण आहे. अशाप्रकारे, पायथागोरसच्या सिद्धान्ताचा उपयोग करून आपण काटकोन त्रिकोणासंबंधीची उदाहरणे सोडवू शकतो.