भारतातील न्यायव्यवस्था

जिल्हा व दुय्यम न्यायालये

views

3:04
ज्या न्यायसंस्थांशी लोकांचा नेहमी संबंध येतो ती जिल्हा आणि तालुका पातळीवरील न्यायालये होत. या न्यायालयांत लोकांचे काही किरकोळ व काही गंभीर स्वरूपाचे तंटे सोडविले जातात. तालुका न्यायालये त्या-त्या तालुक्यासाठी मर्यादित स्वरूपाचे काम पाहत असतात. तर जिल्हा न्यायालये संपूर्ण जिल्ह्यासाठी काम पाहत असतात. प्रत्येक जिल्हा न्यायालयात एक जिल्हा न्यायाधीश असतो. जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक राज्यपाल उच्च न्यायालयाच्या सल्ल्याने करतात. भारतातील कायदा पद्धतीच्या शाखा :- भारतातील कायदा पद्धतीच्या प्रमुख दोन शाखा आहेत. १. दिवाणी कायदा २. फौजदारी कायदा. या दोन शारवांची आपण सविस्तर माहिती घेऊ. दिवाणी कायदा :- व्यक्तीचे हक्क जर डावलले किंवा नाकारले जात असतील त्यातून होणारे वाद किंवा तंटे दिवाणी कायदयाच्या अंतर्गत येतात. उदा. जमिनीसंबंधीचे वाद: भावाभावांत किंवा नातेसंबंधांत जमिनीच्या वाटणीवरून वाद झाल्यास ते दिवाणी न्यायालयात मिटवले जातात. तसेच भाडेकरार घटस्फोट इत्यादींशी. संबंधित याचिका न्यायालयापुढे दाखल केल्यानंतर न्यायालय त्यावर निर्णय देते. याचिका म्हणजे अर्ज. फौजदारी कायदा :- गंभीर स्वरूपाचे गुन्हे असतील तर ते फौजदारी कायद्याच्या आधारे सोडवले जातात. उदा. चोरी, घरफोडी. हुंड्यासाठी छळ, हत्या इ.