अंकगणिती श्रेढी

प्रस्तावना

views

5:16
आज आपण गणित भाग १ मधील तिसरे प्रकरण अंकगणिती श्रेढी म्हणजे काय? व त्यावर आधारित विविध उदाहरणे कशाप्रकारे सोडवतात याचा अभ्यास करणार आहोत. अंकगणिती श्रेढीचा अभ्यास करण्याआधी क्रमिका म्हणजे काय ते जाणून घेऊया. मी आता फळ्यावर काही संख्या लिहितो. 1,2,3,4,5,6,……..या संख्या क्रमाने लिहिल्या. ही संख्यांची मालिका आहे. या मालिकेत कोणती संख्या कितव्या स्थानावर आहे ते आपण सहज सांगू शकतो. जसे 5 ही संख्या 5व्या स्थानावर आहे. 2,4,6,8,10,…..ही संख्यांची मालिका पहा, या मालिकेत प्रत्येक संख्या 2 ने वाढत जात आहे.