चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार

प्रस्तावना

views

4:54
मागील इयत्तेमध्ये आपण त्रिकोणाचे गुणधर्म व दिलेल्या मापावरून त्रिकोणाची रचना कशी करायची ते पाहिले. त्याची उजळणी म्हणून आपण काही त्रिकोणांच्या रचना पाहूया. 1) ∆ ABC मध्ये l(AB)= 5 cm, l(BC) = 5.5 सेमी, l(AC) = 6 सेमी आहे. सर्वप्रथम मोजपट्टीच्या साहाय्याने बाजू AB =5 cm काढा. आता कंपासमध्ये 5.5 सेमीचे माप घ्या. कंपासचे लोखंडी टोक बिंदू B वर ठेऊन वरच्या बाजूस एक कंस काढून घ्या. आता कंपासमध्ये 6 सेमीचे माप घेऊन कंपासचे लोखंडी टोक A बिंदूवर ठेवा. आणि अगोदरच्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढून घ्या. दोन्ही कंसाच्या छेदन बिंदूला C हे नाव द्या. आता बाजू BC व बाजू AC मोजपट्टीच्या साहाय्याने जोडून घ्या. पहा, आपला ABC हा दिलेल्या मापाएवढा तयार झाला. चौकोन रचना: मुलांनो लक्षात ठेवा की, वरील त्रिकोण रचनांचा वापर आपल्याला चौकोन काढण्यासाठी होणार आहे. आपल्याला माहित आहे की कोणत्याही चौकोनाचे चार कोन, चार बाजू, व दोन कर्ण असे एकूण दहा घटक असतात.