सूट व कमिशन

प्रस्तावना

views

3:50
मागील इयत्तेमध्ये आपण शेकडेवारी कशी काढतात ते शिकलो. शेकडेवारीलाच आपण टक्के, शतमान अशा विविध नावाने ओळखतो. शेकडा दर्शविण्यासाठी (%) हे चिन्ह वापरतात आणि याचे वाचन टक्के असे करतात. शेकडेवारी हे एक गुणोत्तरच आहे. ज्याचा छेद 100 आहे ते गुणोत्तर म्हणजे शेकडेवारी होय. उदा. 1) 25/100 म्हणजेच 25% 2) 75/100 म्हणजेच 75% मुलांनो, याच पद्धतीचा वापर करून आता आपण उजळणी म्हणून काही उदाहरणे पाहूया.