प्रदूषण

प्रस्तावना

views

3:38
प्रस्तावना: आजच्या या विज्ञान युगात मानवी जीवनात खूपच प्रगती झालेली आहे. विविध क्षेत्रांत विचारांच्या पलीकडे आमूलाग्र बदल झालेले दिसून येतात. मात्र या बदलत्या परिस्थितीमुळे विविध प्रकारच्या समस्याही वाढत गेल्या आहेत. काही समस्या ह्या इतक्या उग्र रूप धारण करत आहेत की, त्यामुळे मानवी आरोग्य धोक्यात आले आहे. आज आपण या पाठात पर्यावरणातील प्रदूषणाविषयी माहिती अभ्यासणार आहोत. प्रदूषणावर नियंत्रण ठेवावे लागेल. मानव जितकी प्रगती करत आहे त्यामध्ये त्याने सर्वप्रथम पर्यावरणाच्या संरक्षणाचा विचार करायला पाहिजे. कारण निसर्गातील या समस्या मानवामुळेच निर्माण झाल्या आहेत. आजच्या जागतिकीकरणाच्या काळात स्पर्धा निर्माण झाली आहे. त्यामुळे औद्योगिकीकरण वाढले आहे. तसेच लोकसंख्याही वाढली आहे. खाणकाम मोठया प्रमाणात होते आहे. तसेच वाहतूकीची साधनेही वाढली आहेत. रासायनिक खतांचा खूप मोठया प्रमाणात वापर करण्यात येत आहे. अशा अनेक मानवनिर्मित कारणांमुळे पृथ्वीवरचे प्रदूषण वाढते आहे. त्यामुळे पृथ्वीवरच्या सर्वच सजीवांवर आणि मानवांवर देखील प्रदूषणाचे खूप वाईट परिणाम होत आहेत. त्याची सविस्तर माहिती आता आपण मिळवणार आहोत.