प्रदूषण

हवा प्रदूषण

views

4:03
हवा प्रदूषण (Air Pollution) :- आता आपण हवा प्रदूषणाविषयी माहिती अभ्यासूया. हवा हा सर्व सजीव सृष्टीचा जीवन जगण्यासाठी लागणारा सर्वात प्राथमिक आधार आहे. कारण परिसरात हवा नाही अशी कल्पनासुद्धा आपण करू शकत नाही. हवेशिवाय आपण किंवा सजीवसृष्टीचा कोणताच घटक क्षणभरही जिवंत राहू शकत नाही. हवेमध्ये अनेक वायू मिसळलेले असतात. नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, इतर वायू, धुलिकण वगैरे. मात्र ते सहजपणे आपल्या डोळयांना दिसत नाहीत. परंतु विशिष्ट प्रक्रियांनी हे वायू वेगळे करता येतात. म्हणून हवा हे वेगवेगळया वायूंचे किंवा घटकांचे मिश्रण आहे असे म्हटले जाते. वेगवेगळ्या इंधनांच्या ज्वलनातून कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड, सल्फर डायऑक्साइड नायट्रोजनची विविध ऑक्साईडे असे वायू बाहेर सोडले जातात. हे वायु खूप घातक परिणाम पर्यावरणावर करतात. असे विविध वायू, घटक हे हवेत मिसळतात व हवा दूषित करतात. “विषारी वायू, धूर, धूलिकण, सूक्ष्मजीव यांसारख्या घातक पदार्थामुळे हवा दुषित होते. त्यास हवेचे प्रदूषण असे म्हणतात. हवेचे हे प्रदूषण सर्व परिसंस्थेतील सजीवांवर वाईट परिणाम घडवून आणतात. त्याची कारणेही वेगवेगळी आहेत. हवा प्रदूषणाची कारणे : हवेचे प्रदूषण हे नैसर्गिक ब मानवनिर्मित अशा दोन्ही कारणांमुळे होते.