प्रदूषण

मानवनिर्मित कारणे

views

4:02
मानवनिर्मित कारणे : आता आपण हवा प्रदूषणाची मानवनिर्मित कारणे अभ्यासूया. 1) इंधनांचा वापर :- मानवाने स्वत:चे जीवन सहज व्हावे यासाठी अनेक प्रकारच्या सुधारणा केल्या. त्यामुळे दगडी कोळसा, लाकूड, एलपीजी, रॉकेल, डिझेल, पेट्रोल, यांच्या वापरामुळे मोठया प्रमाणात कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड, सल्फर डायऑक्साइड, शिसे यांची संयुगे हवेत मिसळतात व हवा दूषित होते. तसेच घनकचरा, शेतीचा कचरा, बागेतील कचरा उघड्यावर जाळल्यामुळे हवा प्रदूषित होते. २) औद्योगिकीकरण: मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झाल्यामुळे विविध कारखान्यातून, म्हणजे पेट्रोरसायने, तेलशुद्धीकरण कारखाने, कागद कारखाने, साखर कारखाने, कापडगिरणी, रबरकारखाने यातून निघणारा धूर हवेत मिसळतो. त्यामुळे गंधकाची भस्मे, नायट्रोजन ऑक्साईड, विविध विषारी वायू हवेत मिसळले जातात व हवा दूषित होते. 3) अणुऊर्जानिर्मिती व अणुस्फोट: अणुऊर्जानिर्मितीमध्ये मोठया प्रमाणात युरेनिअम, थेरिअम, ग्रॅफाइट, प्लुटोनिअम ही मूलद्रव्ये वापरली जातात. यांच्या वापराने किरणोत्सर्जन होते व हवेचे प्रदूषण होते. ही सर्व हवेच्या प्रदूषणाची नैसर्गिक व मानवनिर्मित प्रमुख कारणे आहेत. परंतु याव्यतिरिक्तही हवेचे प्रदूषण करणारी आणखी काही कारणे आहेत.