प्रदूषण

हवा प्रदूषणाचा वनस्पती व प्राणी यांवर होणारा परिणाम

views

3:01
1) वनस्पती :- १. वनस्पतींची पर्णछिद्रे बुजून जातात. कारण हवेच्या प्रदूषकातील काही घन कण हे पर्णछिद्रात अडकतात. २. हवा प्रदुषणामुळे प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावते. वनस्पतींचे अन्न तयार होण्यासाठी प्रकाश संश्लेषण आवश्यक असते. ३. पुरेसे अन्न तयार न झाल्याने वनस्पतींची वाढ खुंटते, पाने गळतात, पाने पिवळी पडतात, वनस्पती वाळून जातात. प्राणी :- 1. हवा प्रदूषणामुळे प्राणीमात्रांना श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो. श्वसनांचे आजार जडतात. माणसांना दमा, कॅन्सर, बेशुद्ध पडणे, घसा खवखवणे, डोळ्यांतून पाणी येणे इ. विकार होतात. २. त्याचप्रमाणे दूषित हवेमुळे डोळयांचा दाह होतो. तसेच डोळ्यांचे विविध आजार होतात. ३. प्राण्यांचे मनौधर्य विचलित होते. अशा प्रकारे हवेच्या प्रदूषणामुळे वनस्पती व प्राणी यांच्यावर विपरीत परिणाम होतात. तुम्हाला ओझोनच्या थराचे महत्त्व माहीतच आहे. ओझोनच्या थरामुळे सूर्याची अतिनील किरणे शोषली जातात. त्यामुळे पृथ्वीवरील जीवसृष्टीची हानी होत नाही. ओझोनच्या थरामुळे सूर्यकिरणे थेट पृथ्वीवर पोहचत नाहीत. त्यामुळे पृथ्वीवरील उष्णता कमी होण्यास मदत होते. म्हणूनच ओझोनचा थर हे एक संरक्षक कवच आहे. हवेमध्ये प्रदूषके म्हणून सोडण्यात येणाऱ्या ‘क्लोरोफ्लुरोकार्बन’ या पदार्थांनी ओझोनच्या रेणूवर प्रक्रिया होते. हा रासायनिक पदार्थ घरातील शीतकपाट म्हणजेच रेफ्रिजरेटरमध्ये वापरला जातो. तसेच विमान, जेट, स्प्रे यातूनही हे प्रदूषक हवेत मिसळते. त्यामुळे या थराला धोका पोहचत आहे आणि हा थर विरळ होत चालला आहे. त्यामुळे पृथ्वीवरील उष्णता वाढते आहे.