प्रदूषण

हरितगृह परिणाम व जागतिक तापमान वाढ

views

3:21
(CO2) कार्बन डायऑक्साइड हा वायू वातावरणात खूप कमी प्रमाणात आढळून येतो. सूर्याची उर्जा शोषून घेण्याचे मुख्य काम हा वायू करतो. गेल्या 100 वर्षांपासून औद्योगिकीरण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या औद्योगिकीरणामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढले आहे. (CO2) कार्बन डायऑक्साइड वायूचा पृथ्वीच्या तापमानावर परिणाम होतो. यालाच आपण ‘हरितगृह परिणाम’ असे म्हणतो. कार्बन डायऑक्साइड वायूप्रमाणेच नायट्रस ऑक्साइड, मिथेन वायू व CFC हे वायू वातावरणातील उष्णता कमी करण्यास मदत करतात. यांना एकत्रितपणे ‘हरितगृह वायू’ म्हणतात. या वाढत्या हरितगृह परिणामामूळे जागतिक तापमान वाढत आहे. यामुळे हवामानात बदल घडून येतात. त्यामुळे पिकांचे उत्पादन वन्यजीवांचे वितरण यात बिघाड झाल्याचे दिसून येते. तसेच हिमनग, हिमनदया वितळून समुद्रपातळीमध्ये वाढ होत आहे.