प्रदूषण

मृदा प्रदूषण

views

3:18
आता आपण मृदा प्रदूषणाविषयी माहिती घेऊ या. आपल्या पृथ्वीच्या भूखंडापैकी वापरात असणारी जमीन खूप कमी आहे त्या जमिनीतही प्रदूषण होत आहे. त्यामुळे मृदेचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. बरं आता तुम्ही मला सांगा की जमिनीची धूप म्हणजे काय? जमिनीच्या वरचा सुपीक थर विविध कारणांनी वाहून जाणे म्हणजे जमिनीची धूप होय. वादळे, पूर अशा विविध कारणामुळे जमिनीची धूप होते. रासायनिक खते, कीटकनाशके यांच्या वापरामुळे, तसेच कारखान्यातील काही उत्सर्जित पदार्थ, काही जैववैद्यकीय पदार्थ, विषारी घनकचरा मातीत मिसळल्यामुळे मृदेची सुपीकता कमी होते. नैसर्गिक बदलांमुळे, मानवी कृतीमुळे मृदेची सुपीकता कमी होत जाते. व कालांतराने जमीन नापीक बनते. आपल्या पृथ्वीवरील एकूण पृष्ठभागावर 29% (एकोणतीस टक्के) भूभाग आहे. मात्र त्यातील काही भाग हा बर्फाच्छादित आहे. काही भाग वाळवंटी आहे तर काही भाग पर्वत व डोंगरांनी व्यापलेला आहे. म्हणजेच यापैकी खूपच कमी भागात आपण वावर करू शकतो किंवा उत्पादन घेऊ शकतो. मात्र त्यातही मृदा दूषित होण्याचे प्रमाण खूप आहे. त्यामुळे आपण मृदा संवर्धनाचे उपाय केले पाहिजेत. “मातीतील भौतिक, जैविक व रासायनिक गुणधर्मात नैसर्गिकरित्या किंवा मानवी कृतीमूळे जे बदल घडून येतात, त्यामुळे जमिनीची उत्पादकता कमी होते. यालाच मृदा प्रदूषण असे म्हणतात.