क्षेत्रफळ

समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ

views

4:33
आता आपण समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काढूया. कृती: आपल्याला माहित आहे की, समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात.या आकृतीत (page no 96 वरील आकृती)ABCD मध्ये l(AC) व l(BD) हे दोन कर्ण आहेत. l(AC)=d1 व l(BD)=d2 मानू.ABCD चे कर्ण p बिंदूत छेदतात त्यामूळे चार एकरूप काटकोन त्रिकोण तयार झाले. प्रत्येक काटकोन त्रिकोणाच्या बाजू (1 )/2 l(AC) व(1 )/2 l(BD) एवढ्या आहेत. चारही त्रिकोणाची क्षेत्रफळे समान आहेत. l(AD) = l(PC) = (1 )/2 l(AC) =(d_1)/2 तसेच l(BD) = l(AD) = (1 )/2 l(BD) =(d_2)/2 ∴ समभुज चौकोन ABCD चे क्षेत्रफळ = 4 x A (APB) = 42 x (1 )/2 x l(AP) x l(BP) = 21 x (d_1)/2 × (d_2)/2 =(1 )/2 x d1 x d2 ∴समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ =(1 )/2 x कर्णाच्या लांबीचा गुणाकार आता याच सूत्रावरून आधारित आपण काही उदाहरणे सोडवूया. उदा.1) एका समभुज चौकोनाच्या दोन कर्णांची लांबी अनुक्रमे 11.2 सेमी व 7.5 सेमी आहे तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा. उकल:समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ = (1 )/2 × कर्णाच्या लांबीचा गुणाकार(सूत्रात किंमत लिहू.) = (1 )/2_1x 11.25.6 x 7.5 = 5.6 x 7.5= 42 चौ.सेमी. ∴ समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 42 चौ.सेमी आहे.