पृष्ठफळ व घनफळ

प्रस्तावना

views

04:41
आतापर्यंत आपण विविध भौमितिक आकृत्यांचा अभ्यास करत आलो आहोत. इष्टिकाचिती, घन, वृत्तचिती, शंकू यांसारख्या आकृत्यांचे घनफळ पृष्ठफळ कसे काढतात? त्यांची सूत्रे काय आहेत? हे पाहिले आहे. तर आता याची उजळणी म्हणून आपण काही भौमितिक आकार व त्यांचे घनफळ व पृष्ठफळ काढण्यासाठी सूत्र कसे तयार झाले हे पाहणार आहोत. दैनंदिन जीवनात इष्टिकाचिती या घनाकृतीचा वापर आपण करत असतो. उदा. पेन्सिलचा बॉक्स, खोडरबर, काडेपेटी, पुस्तक, वीट इत्यादी. अशा अनेक वस्तू आपल्या आजूबाजूला असतात. ही इष्टिकाचितीची आकृती आहे. येथे l म्हणजे इष्टिकाचितीची लांबी, b म्हणजे इष्टिकाचितीची रुंदी व h म्हणजे इष्टिकाचितीची उंची आहे. आपल्याला माहीत आहे की, इष्टिकाचितीला 6 पृष्ठे असतात, प्रत्येक पृष्ठ आयताकार असते. आणि तिच्या समोरासमोरील पृष्ठे एकरूप असतात. इष्टिकाचितीला 6 पृष्ठे असतात. त्यांपैकी 4 पृष्ठे उभी असतात व 2 आडवी असतात. यातील आडवी दोन पृष्ठे काढून टाकूया. इष्टिकाचितीचे उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ काढताना आपल्याला प्रत्येक उभ्या पृष्ठाचे क्षेत्रफळ आणि त्यांची बेरीज घ्यावी लागेल. सामोरासमोरील पृष्ठ lh व bh आहेत. म्हणून इष्टिकाचितीच्या उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ = lh+lh+bh+bh. सर्व पृष्ठांची बेरीज म्हणून आपण 2lh + 2bh घेऊ. येथे 2 व h हे सामाईक आहेत म्हणून ते एकदाच घेऊ. यावरून पुढील सूत्र तयार होईल: इष्टिकाचितीच्या उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ = 2×(लांबी + रुंदी)× उंची= (2(l+b) × h)