गुणाकार व भागाकार Go Back मिश्र उदाहरणे views 5:4 मिश्र उदाहरणे :- मिश्र उदाहरणे म्हणजे, अशी उदाहरणे ज्यामध्ये एकापेक्षा जास्त क्रियांचा समावेश असतो. हे उदाहरण सोडवताना बेरीज, वजाबाकी, गुणाकार किंवा भागाकार यांपैकी दोन किंवा तीन क्रियांचा उपयोग करावा लागतो. उदाहरण नीट वाचून समजून घेतले की अशी उदाहरणे सोडवायला अवघड नसतात. आज आपण गुणाकार, भागाकार शिकलो. त्यावरील विविध उदाहरणांचा अभ्यास केला. आता आपल्याला या दोन्ही क्रिया एकत्रितपणे अभ्यासायच्या आहेत. त्यासाठी आपण खाली दिलेल्या काही उदाहरणांचा अभ्यास करूया. उदा.1 शामरावाने 1870 रुपयास 1 या प्रमाणे 7 टेबले खरेदी केली. ती सर्व टेबले 14230 रु. प्रमाणे विकली. तर शामरावांना किती रुपये जास्त किंवा कमी मिळाले? स्प्ष्टीकरण :- वरील उदाहरणाचा नीट अभ्यास केला तर आपल्या असे लक्षात येईल की ; या उदाहरणामध्ये गुणाकार व वजाबाकी या दोन क्रियांचा समावेश आहे. 1870 रु.ला एक टेबल याप्रमाणे आपल्याला 7 टेबलाची किंमत काढून घ्यावी लागेल. आणि त्यासाठी आपल्याला गुणाकार ही क्रिया करावी लागेल. म्हणून 7 टेबलाची खरेदी किंमत 13090 रु. आहे. पण ती सर्व टेबले शामरावांनी 14230 रुपयांना विकली आहेत. जर शामरावांना या व्यवहारात फायदा झाला किंवा तोटा हे शोधण्यासाठी आपल्याला विक्री किंमती मधून खरेदी किंमत वजा करावी लागेल. म्हणून आपण 14230 - विक्री किंमत मधून 13090 – खरेदी किंमत वजा करू. 01140 – एकूण बाकी रक्कम, तर शामरावांना या व्यवहारात 1140 रु. जास्त मिळाले. गुणाकार तीन अंकी संख्यांचा गुणाकार उदाहरणे दोन समूहातील वस्तूंच्या वेगवेगळ्या प्रकारे जोड्या भागाकार शाब्दिक उदाहरण मिश्र उदाहरणे