शिवपूर्वकालीन भारत

मुघल सत्ता

views

5:26
मुघल सत्ता : मुलांनो, आता आपण मुघल सत्तेविषयी माहिती करून घेणार आहोत. इ.स.1526 मध्ये इब्राहीम लोदीचा बाबराने पराभव केला आणि त्याचबरोबर दिल्ली येथील सुलतानशाही संपुष्टात आली. आणि तेथे मुघल सत्तेची स्थापना झाली. बाबराने भारतात मुघल सत्तेचा पाया घातला. बाबर हा भारतातील मुघल सत्तेचा संस्थापक होता. बाबरचे पूर्ण नाव जहिर उद-दिन मुहम्मद बाबर असे होते. मध्य आशियातील सध्याच्या उझबेकिस्तानमधील फरघाना राज्याचा बाबर हा राजा होता. त्याने इब्राहीम लोदी याचा पराभव केला. बाबर व इब्राहीम लोदी यांच्यात झालेल्या या लढाईला ‘पानिपतची लढाई’ असे म्हणतात. बाबराच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा हुमायून हा गादीवर बसला. हुमायूनच्या कारकिर्दीत शेरशाहने त्याचा पराभव केला. आणि दिल्लीच्या गादीवर सूर घराण्याची सत्ता आली. हुमायूननंतर अकबर गादीवर आला. संपूर्ण भारतावर राज्य करण्याची अकबराची महत्त्वाकांक्षा होती. अकबरानंतर जहांगीर हा सम्राट झाला. त्याच्या कारकिर्दीत त्याची पत्नी नूरजहान हिने प्रभावी कामगिरी बजावली. जहांगीरानंतर शाहजहान सम्राट झाला. शाहजहाननंतर औरंगजेब हा खूप वर्ष सम्राट होता. त्याच्या मृत्यूनंतर मात्र मुघल साम्राज्य संपुष्टात आले.