शिवपूर्वकालीन भारत

राजपुतांशी संघर्ष

views

3:02
राजपुतांशी संघर्ष : अकबराचे धार्मिक धोरण हे सहिष्णुतेचे होते तर औरंगजेबाचे असहिष्णुतेचे होते. अकबराने अनेक राजांशी सलोखा निर्माण केला होता. त्यात राजपुतांचाही समावेश होता. परंतु हा सलोखा औरंगजेबाला राखता आला नाही. त्याला आपल्या साम्राज्य विस्तारात राजपुतांचे सहकार्य मिळविता आले नाही. राजस्थानच्या पश्चिमेकडील भागात मारवाड या ठिकाणी राजपुतांचे राज्य होते. मारवाडचा राणा जसवंतसिंह याच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने त्याचे राज्य आपल्या मुघल साम्राज्यास जोडून घेतले. परंतु दुर्गादास राठोड याने जसवंतसिंहचा अल्पवयीन मुलगा अजितसिंह याला मारवाडच्या गादीवर बसविले. दुर्गादास राठोड हा मारवाडचा सेनापती होता. त्याने अजितसिंहच्या वर्चस्वाखाली मुघलांविरोधी मोठा संघर्ष केला. दुर्गादासाचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी औरंगजेबाने आपला पुत्र दुसरा अकबर यास मारवाडमध्ये पाठविले. परंतु अकबरच राजपुतांना जाऊन मिळाला. आणि त्याने औरंगजेबाविरुद्ध बंड पुकारले. या बंडात मराठ्यांची मदत घेण्याचाही प्रयत्न झाला. तरीही दुर्गादास राठोड याने मारवाडच्या अस्तित्वासाठी मुघलांविरुद्धचा संघर्ष चालूच ठेवला.