नफा – तोटा

नफा – तोटा संकल्पना

views

4:23
नफा – तोटा संकल्पना :मुलांनो तुम्ही रोजच्या व्यवहारात नफा – तोटा हे शब्द ऐकले असतीलच. बरं मग, मला सांगा नफा म्हणजे काय ? विद्याथी: - नफा म्हणजे फायदा शिक्षक:- बरोबर. आणि तोटा म्हणजे काय? विद्याथी:- तोटा म्हणजे नुकसान शिक्षक:- अगदी बरोबर आपल्याला हे माहीत आहे की, पैसे कमवण्यासाठी लोक वेगवेगळी कामे करतात. आणि त्यांना मिळालेल्या पैंशातून ते त्यांना हव्या असलेल्या वस्तू विकत घेतात. ग्राह्कांना ज्या वस्तू हव्या असतात त्या वस्तू विकण्याचा व्यवसाय दुकानदार करतात. हे दुकानदार घाऊक व्यापाऱ्यांकडून त्या वस्तू मोठ्या प्रमाणात स्वस्त दराने खरेदी करतात. आणि ग्राहकांना छापील किमतीच्या दराने त्या वस्तू विकतात. त्यांनी घाऊक व्यापाऱ्याकडून खरेदी केलेल्या वस्तूंच्या खरेदीची किंमत त्या वस्तूवर असणाऱ्या छापील किमतीपेक्षा कमी असते. शिवाय या वस्तू सुट्या करून विकल्याने त्यांची किंमत दुकानदारास जास्त मिळते. पण कधीकधी असेही होते की त्याने विकत घेतलेल्या सर्वच वस्तू न विकल्याने शिल्ल राहतात. त्यामुळे त्याने जेवढे पैसे त्या वस्तूंसाठी खर्च केले असतात तेही त्याला पूर्णपणे त्याच्या विक्रीतून मिळत नाहीत. अशावेळी त्याचे नुकसान होते. तर अशाप्रकारे जर विक्रीची किंमत ही खरेदीच्या किमतीपेक्षा जास्त असेल, तर फायदा होतो. त्याला नफा असे म्हणतात. आणि जर विक्रीची किंमत खरेदीच्या किमतीपेक्षा कमी असेल, तर नुकसान होते. यालाच तोटा असे म्हणतात. नफा = विक्री किंमत - खरेदी किंमत तोटा = खरेदी किंमत - विक्री किंमत