गुणाकार भाग १

गुणाकार (दोन अंकी संख्येला एक अंकीने गुणणे)

views

3:41
गुणाकार (दोन अंकी संख्येला एक अंकीने गुणणे) :शि: मुलांनो, तिसरीपासून आपण गुणाकार शिकतो आहोत. आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगणार आहे. एका पेन्सिलची किंमत ४ रुपये आहे, आणि मला ३ पेन्सिल विकत घ्यायच्या आहेत. तर दुकानदाराला मला किती रुपये द्यावे लागतील बरं? वि: सर १ पेन्सिल ४ रुपये व ३ पेन्सिल घ्यायच्या आहेत. म्हणजेच ४ रुपये+ ४ रुपये+४ रुपये=१२रुपये दयावे लागतील.शि: बरोबर! हेच आपण ४ x 3 = १२ (४ गुणिले ३ बरोबर १२) अशा पद्धतीने पण लिहू शकतो. एकावरून अनेकांची जेव्हा किंमत काढली जाते तेव्हा गुणाकार करावा लागतो. या गुणाकाराची संकल्पना आपण तिसरीत समजून घेतली. या प्रकरणात आपण एका नव्या पद्धतीने गुणाकार कसा करायचा हे समजून घेणार आहोत.