आरोग्य व रोग

रोग

views

5:33
विविध प्रकारचे रोग हे आपल्या शरीराला त्रासदायक असू शकतात. रोग म्हणजे शरीरक्रियात्मक किंवा मानसशास्त्रीयरीत्या शरीरातील महत्त्वाच्या जैविक कार्यामध्ये अडथळा आणणारी स्थिती होय. यात शरीरक्रियात्मक अडथळा म्हणजे शरीराच्या कार्यात अडथळा निर्माण होणे. उदाहरणार्थ पचनक्रियेत, रक्ताभिसरण संस्थेत वा किडनीच्या कार्यात अंतर्गत बिघाड होणे. थोडक्यात शरीराच्या आंतरेंद्रियात बिघाड होणे आणि मानसशास्त्रीयरीत्या अडथळा म्हणजे मेंदूच्या कार्यात बिघाड वा मनाचा समतोल ढासळणे. रोग हे विविध प्रकारचे असतात. म्हणून त्यांचा प्रसार होण्याची कारणे व माध्यमे वेगवेगळी असतात. त्यांची लक्षणेही वेगवेगळी असतात.