आरोग्य व रोग

स्वाईन फ्लू

views

3:17
स्वाईन म्हणजेच डुक्कर व फ्लू म्हणजेच ताप. स्वाईन फ्लू हा संसर्गजन्य विकार असून याचा संसर्ग स्वाईन फ्लूच्या (H1N1) या विषाणूपासून होतो. 1) स्वाईन फ्लूचे विषाणू हे हवेत 8 तास जिवंत राहू शकतात. स्वाईन फ्लूचा संसर्ग डुक्करांकडून मनुष्यामध्ये होत असतो. त्याचप्रमाणे ज्या रोग्याला स्वाईन फ्लूची लागण झाली त्यापासूनही हा रोग दुसऱ्यांना होतो. 2) स्वाईन फ्लूचे विषाणू हे बाधित व्यक्तीच्या खोकल्याने किंवा शिंकल्यामुळे हवेत पसरतात. निरोगी व्यक्तीच्या नाक, डोळे, तोंड, त्वचा ह्यांचेशी संपर्क झाल्यास या विषाणूंचे संक्रमण होते. अशा प्रकारे स्वाईन फ्लू चा प्रसार होतो.