आरोग्य व रोग

एड्स

views

2:46
एड्स म्हणजेच Acquired Immune Deficiency Syndrome हा रोग HIV (Human Immunodeficiency Virus) या विषाणूमुळे मानवाला होतो. या रोगांची लागण झालेल्या व्यक्तीची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे त्या व्यक्तीला विविध रोगांची लागण होते. निदान प्रयोगशाळेत रक्ताची तपासणी केल्याशिवाय निश्चित करता येत नाही. निदान करण्यासाठी रक्ताची ELISA ही चाचणी केली जाते. एड्स झालेल्या रुग्णांमध्ये कोणत्याही रोगांची लागण सहज होते. कारण एच.आय.व्ही रक्तातील रोगप्रतिकारक पेशी लिमोसाईट्सवर आक्रमण करतात. एड्स पीडितांच्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता कमी झाल्यामुळे सर्दी, खोकला, क्षयरोग (T.B) यांसारखे आजार होतात. त्यावर यशस्वी उपचार करणेही शक्य होत नाही. एच.आय.व्ही संसर्गापासून एड्स होईपर्यंत 8 ते 10 वर्ष यापेक्षाही जास्त काळ लागतो. एड्स ही मोठ्या प्रमाणात घातक अशी समस्या आहे.