आरोग्य व रोग

प्राण्यांमार्फत होणारा रोगप्रसार

views

4:00
आजूबाजूला उंदीर, घुशी, मांजर, कुत्रा असे अनेक प्राणी, पक्षी पाहतो यांच्यामार्फत काही आजार पसरत असतात. रेबीज हा विषाणूजन्य रोग आहे. हा रोग संसर्ग झालेला कुत्रा, मांजर, माकड, ससा अशा प्राण्यांच्या चावण्यामुळे होतो. या रोगाचे विषाणू मज्जातंतूद्वारे मेंदूत प्रवेश करतात. आणि संपूर्ण शरीराचा ताबा घेतात. ‘जलद्वेष म्हणजेच Hydrophobia या रोगाची लागण झालेल्या व्यक्ती पाण्याला घाबरतात. हे या रोगाचे मुख्य लक्षण आहे. हे या रोगाचे मुख्य लक्षण आहे. या रोगामध्ये रोगी पाण्याला घाबरतात म्हणून यास ’जलसंत्रास’ असेही म्हणतात. ह रोग प्राणघातक आहे. मात्र हा रोग होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक लस घेऊन सुरक्षित होता येते. झुरळ, माशा, कीटक हे अन्नपदार्थावर बसून अन्न दूषित करतात व असे अन्न खाल्ल्याने आपण आजारी पडतो.