आरोग्य व रोग

मधुमेह

views

2:28
मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी गोड पदार्थ खाण्याचे टाळले पाहिजे. स्वादुपिंडात निर्माण होणारे ‘इन्सुलिन’ नावाचे एक संप्रेरक असते. हे संप्रेरक रक्तामध्ये असणाऱ्या ग्लुकोज शर्करेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवते. इन्सुलिनचे प्रमाण कमी झाले की शर्करेचे प्रमाण नियंत्रित होत नाही. याच विकाराला मधुमेह असे म्हणतात. मधुमेह हा दीर्घकालीन उपचार करावा लागणारा आजार आहे. मधुमेह असणाऱ्या रूग्णाने स्वत:च्या तब्येतीची काळजी घेतली नाही आणि मधुमेहाने गंभीर स्वरूप धारण केले तर मुत्रपिंड निकामी होणे, हदयविकार, पक्षाघात, अंधत्व आणि सूक्ष्म रक्तवाहिन्या निकामी होणे, जखमा लवकर बऱ्या न होणे. अशा विविध आजारांचा सामना करावा लागतो.