आरोग्य व रोग

हदयविकार

views

4:13
हृदयांच्या स्नायूंना रक्ताचा पुरवठा कमी झाल्यामुळे ऑक्सिजन व पोषक द्रव्यांचा पुरवठा अपुरा पडला तर ह्दयाची कार्यक्षमता कमी होते. त्यामूळे ह्दयाला जास्त काम करावे लागते. त्यामुळे ह्दयावर ताण येतो व ह्दयविकाराचा झटका येतो. जर धमण्यांमध्ये अडथळे येऊ लागले तर ह्दयाला रक्त मिळत नाही. ह्दयविकारात धोक्याची पातळी ही ह्दयाच्या स्नायूंना किती दुखापत झाली आहे यावर अवलंबून असते. मृत स्नायूंमुळे ह्दयाला होणाऱ्या रक्तपूरवठयाचा वेग कमी होतो. त्यामुळे ह्दयविकाराचा झटका आला की त्वरित डॉक्टरांचा सल्ला व औषधोपचार घ्यायला पाहीजेत. छातीत सहन न होणाऱ्या वेदनेकडे दुर्लक्ष करू नये. तसेच छातीतील वेदनेमूळे खांदे, मान व हात दुखणे, हात आखडणे, घाम येणे, अस्वस्थता जाणवणे अशी लक्षणे आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये.