आरोग्य व रोग

औषधांचा गैरवापर केल्याने होणारे धोके

views

4:56
औषधे जास्त प्रमाणात सेवन केली तर आपल्या शरीरावर याचे वाईट परिणाम होतात. जास्त प्रमाणात व सतत जर वेदनाशामके (pain killer) घेतली तर चेतासंस्था, उत्सर्जन संस्था, यकृत यावर खूप वाईट परिणाम होतात. तसेच प्रतिजैविकांचे (Antibotics) जास्त प्रमाणात सेवन केले तर मळमळ, पोटदुखी, पातळ जुलाब, अंगावर पुरळ येणे, जिभेवर पांढरे चट्टे पडणे अशी वेगवेगळी लक्षणे दिसून येतात व त्याचा शरीराला त्रास होतो.