मराठयांच्या सत्तेचा विस्तार

प्रस्तावना

views

2:16
मागील पाठात आपण मराठयांच्या स्वातंत्र्यसंग्रामाविषयी माहिती घेतली. मराठयांच्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या सुरुवातीला मराठयांचे धोरण बचावाचे होते, तर मुघल सत्ता आक्रमक होती. स्वातंत्र्यसंग्रामाच्या शेवटी मात्र परिस्थिती एकदम उलट पहावयास मिळाली. तेव्हा मराठे आक्रमक झाले होते तर मुघलांचे धोरण हे बचावाचे होते. अठराव्या शतकाच्या शेवटच्या काही वर्षांमध्ये मराठयांनी मुघल सत्तेला पराभूत करून जवळजवळ सर्व भारतभर आपली सत्ता स्थापन केली. ती कशा प्रकारे केली याची माहिती आपण या पाठात घेणार आहोत. शाहू महाराजांची सुटका :- इ.स १७०७ मध्ये औरंगजेब बादशाहचा मृत्यू झाला. शाहजादा आझमशाह हा औरंगजेबचा मुलगा दक्षिणेत होता. त्याच्या कैदेत असलेले येसूबाई आणि छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज यांना त्याने सोडले. त्यामागे त्याचा हेतू वेगळा होता. आझमशाहाचा कोणताही हेतू असला तरी पण शाहू महाराजांची सुटका होणे ही स्वराज्याच्या दृष्टीने चांगली घटना होती.