साम्राज्याची वाटचाल

प्रस्तावना

views

5:19
मागील पाठात आपण मराठी सत्तेचा उदय व विस्तार कसा झाला ते पाहिले. तसेच स्वराज्यस्थापनेपासून ते साम्राज्य विस्तारापर्यंतचा प्रवास कसा झाला याची माहिती घेतली. मराठ्यांचे वर्चस्व उत्तर भारतात निर्माण झाले, कारण मराठ्यांकडे असणारे शूर मावळे व अनुभवी सरदार, त्यांच्यामुळे मराठी सत्ता दिल्लीपर्यंत मजल मारू शकली. त्यातील महत्त्वाचे योगदान मराठी सरदार घराण्यांचे आहे. त्यामध्ये भोसले, शिंदे, होळकर यांसारख्या सरदारांनी मराठी सत्तेच्या विस्तारात सिंहाचा वाटा उचलला. त्यांच्या कार्याची माहिती आपण या पाठात करून घेणार आहोत. इंदौरचे होळकर: मराठ्यांच्या साम्राज्याविस्तारात महत्त्वाची भूमिका इंदौरच्या होळकर घराण्याने बजावली. होळकरांच्या सत्तेचे संस्थापक मल्हारराव होळकर होत. त्यांनी अनेक वर्षे मराठी राज्याची सेवा केली. गनिमी कावा ही शिवाजी महाराजांची युद्ध पद्धती मल्हारराव होळकरांना अतिशय चांगल्या प्रकारे अवगत होती. पानिपतानंतर उत्तरेत मराठ्यांची मानहानी झाली होती. मराठ्यांची गेलेली प्रतिष्ठा परत मिळविण्यास माधवराव पेशव्यास मल्हारराव होळकर यांनी लाखमोलाची साथ दिली. अहिल्याबाईनी १७६७ ते १७९५ या काळात शासन केले. वयाच्या ७० व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यानंतर १७९५ ते १७९७ या कालावधीत तुकोजीने कारभार सांभाळला. त्यांच्या मृत्यूनंतर यशवंतराव होळकरांनी १७९७ ते १८११ या काळात राज्यकारभार पाहिला.