मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये

प्रस्तावना

views

4:17
प्रस्तावना : मुलांनो, आतापर्यंत आपण संविधानाबाबत अनेक गोष्टी माहीत करून घेतल्या. संविधान म्हणजे काय? त्यात कोणत्या गोष्टींचा समावेश आहे? शासनाने किंवा संविधानाने आपल्याला कोणते हक्क दिले आहेत आणि त्याचबरोबर आपली कर्तव्ये काय आहेत? आपले हक्क कोणी हिरावून घेऊ नयेत म्हणून त्यांना कायदयाने संरक्षण का दिले? मार्गदर्शक तत्त्वे : संविधानाच्या उद्देशिकेत संविधानाची उद्दिष्टे स्पष्ट केली आहेत. या उद्दिष्टपूर्तीसाठी शासनाने कोणत्या उपाय योजना कराव्यात, याबाबत ज्या सूचना संविधानाने दिल्या आहेत, त्या सुचनांनाच ‘मार्गदर्शक तत्त्वे’ असे म्हणतात. मार्गदर्शन तत्त्वांचा समावेश का केला? मुलांनो, आता या मार्गदर्शन तत्त्वांचा समावेश संविधानात का केला आहे त्या विषयी जाणून घेऊ. जेव्हा भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा देशाची अवस्था खूपच बिकट होती. गरिबी, बेकारी, अशिक्षितपणा, मागासलेपणा यांसारख्या भयंकर समस्या देशात होत्या. अशा वेळी देशातील बेकारी कमी करणे, गरिबी घालवणे, देशात शिक्षणाच्या सुविधा निर्माण करणे, कायदा व सुव्यवस्था स्थापन करणे, देशहिताची, लोककल्याणाची कामे करणे या सर्व गोष्टी आवश्यक होत्या. लोकांच्या कल्याणाचे उद्दिष्ट साध्य करायचे होते.