भारतातील न्यायव्यवस्था

प्रस्तावना

views

6:04
कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ यांच्याबरोबरच न्यायमंडळ हा सुद्धा शासनसंस्थेचा एक महत्त्वाचा घटक आहे. कायद्यांची निर्मिती कायदेमंडळ करते. कार्यकारी मंडळ कायदेमंडळाने केलेल्या कायद्यांची अंमलबजावणी करते. तर न्यायमंडळ न्याय देते. आज आपण या पाठात न्यायमंडळ न्यायदान कसे करते, त्यामुळे समाजातील अन्याय कसा दूर होतो व त्यातून सामाजिक स्वास्थ्य कसे प्राप्त होते याचा विचार करणार आहोत. त्यापूर्वी आपण आपल्या किंवा समाजातील प्रत्येक व्यक्तीला न्यायदानाची आवश्यकता का असते ते समजून घेऊ.