भारतातील न्यायव्यवस्था

न्यायमंडळाची रचना

views

2:40
भारत हे संघराज्य आहे. म्हणजेच भारतात केंद्रशासन व घटक राज्यातील राज्यशासन या दोन्हीमार्फत राज्यकारभार चालविला जातो. केंद्रशासनाप्रमाणे घटकराज्यांना स्वतंत्र कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ असते. परंतु तसे न्यायमंडळाचे नाही. न्यायमंडळ मात्र संपूर्ण देशासाठी एकच आहे. त्यात केंद्राचे वेगळे न्यायमंडळ व घटकराज्यांचे वेगळे न्यायमंडळ अशी स्वतंत्र विभागणी नाही. याचाच अर्थ घटनेने भारतासाठी एकेरी न्याय व्यवस्थेची तरतूद केली आहे. किंवा भारतातील न्यायव्यवस्था एकात्म स्वरुपाची आहे. या न्यायव्यवस्थेच्या सर्वात वरच्या पातळीवर भारताचे सर्वोच्च न्यायालय असून त्याखाली घटकराज्यांतील उच्च न्यायालये आहेत. तर उच्च न्यायालयांच्या नियंत्रणाखाली जिल्हा न्यायालये व त्यानंतर दुय्यम न्यायालये अशी रचना आहे. म्हणजेच, सर्वोच्च न्यायालय – उच्च न्यायालये – जिल्हा न्यायालये - दुय्यम न्यायालये अशा प्रकारची उतरडींची रचना आहे.