आनुवंशिकता व उत्क्रांती

डी.एन.ए व आर.एन.ए

views

3:23
आता आपण डी.एन.ए व आर.एन.ए म्हणजे काय ते समजून घेऊ या. DNA म्हणजे Deoxyribo Nucleic Acid. इ.स 1869 साली श्वेत रक्तपेशींचा अभ्यास करतांना स्वीस जीव-रसायनशास्त्रज्ञ फेड्रिक मिशर याने या आम्लाचा शोध लावला. डी.एन.ए चा रेणू हा दोन सर्पिल व एकमेकांत गुंतलेल्या न्युक्लिओटाइड धाग्यांचा बनलेला असतो. प्रत्येक न्युक्लिओटाइड हा नायट्रोजनयुक्त पदार्थ, डी.ऑक्सीरायबोज शर्करा आणि फॉस्फोरिक आम्ल यांपासून बनलेला असतो. नायट्रोजनयुक्त पदार्थ हे प्युरीन व पिरिमिडीन असे दोन प्रकारचे असतात. पिरिमिडीनमध्ये अॅडेनीन व ग्वानीन हे दोन प्युरीन तर सायटोसीन व थायमीन हे पदार्थ असतात. तसेच यामध्ये अॅडेनीनची थायमीन बरोबर आणि ग्वानीनची सायटोसीन बरोबर जोडी असते. यामध्ये अॅडेनीन व थायमीन हे द्वी-हायड्रोजन बंधाने तर ग्वानीन आणि सायटोसीन हे त्री- हायड्रोजन बंधाने एकमेकांना जोडलेले असतात. हायड्रोजनबंधनामुळे शिडीतील पायऱ्यांप्रमाणे DNA च्या सर्पिल रेणूंचे दोन्ही धागे जोडलेले असतात. यास द्विसर्पिल रचना असेही म्हणतात. RNA म्हणजे Ribo Nuclic Acid. हे पेशीतील दुसरे महत्त्वाचे न्युक्लीक आम्ल होय. हे न्युक्लिओटाइडने बनलेले, एकच धागा असलेले न्युक्लीक आम्ल असते. त्यामध्ये रायबोज शर्करा, फॉस्फेटचे रेणू व नत्रयुक्त पदार्थ असतात. ग्वानीन, सायटोसीन, अॅडेनीन व युरॅसिल हे चार नायट्रोजनयुक्त पदार्थ RNA मध्ये असतात. यांपैकी ग्वानीन व अॅडेनीन हे प्युरीन आहेत. तर सायटोसीन व युरॅसिल हे पिरिमिडीन आहेत. RNA हा केंद्रक आणि पेशीद्रव्य या दोन्ही ठिकाणी आढळतो. RNA च्या कार्यप्रणालीनुसार मॅसेंजर RNA(m- RNA), रायबोझोमल RNA (r-RNA) व ट्रान्सफर RNA (t-RNA) असे तीन प्रकार पडतात.