आनुवंशिकता व उत्क्रांती

डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत

views

5:09
आता आपण डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत याविषयी माहिती जाणून घेऊ या. चार्ल्स डार्विन यांनी वेगवेगळ्या प्रदेशातील वनस्पती व प्राण्यांचे वेगवेगळे नमुने गोळा केले. त्यावरून डार्विनने ‘सक्षम ते जगतील’ असा सांगणारा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडला. म्हणजेच जे सजीव त्या वेळच्या पर्यावरणास जुळवून घेण्यास सक्षम असतील तेच सजीव पुढील काळात जगतील असे त्यांनी मांडले. त्यासाठी त्यांनी ‘ओरीजीन ऑफ स्पेसीज’ हे पुस्तकही प्रकाशित केले. या पुस्तकात त्यांनी असे मत मांडले की, सर्व जीव हे मोठ्या संख्येने पुनरुत्पादन करत असतात. हे जीव एकमेकांशी स्पर्धा करत असतात. ही स्पर्धा जीवघेणी असते. या स्पर्धेमध्ये जो जीव जिंकण्यासाठी आवश्यक गुणधर्म दाखवतो तोच जीव तग-धरून राहतो. आणि तोच जीव टिकतो. मात्र अशावेळी नैसर्गिक निवडही महत्त्वाची असते. कारण निसर्गामध्ये सुयोग्य म्हणजेच योग्य असेच जीव जगतात व बाकीचे जीव मरतात. जे जीव जगतात ते पुनरुत्पादन करू शकतात. ते आपल्या नवीन वैशिष्ट्यांसकट नवीन प्रजाती तयार करतात. एखादा सजीव त्याला फायदेशीर ठरणारे एखादे वैशिष्टय घेऊन जन्माला आला व टिकू शकला तर त्याची पुढची पिढी त्याच्यासारखीच बनते. यालाच डार्विनचा दुसरा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत असे म्हणतात. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत हा बऱ्याच काळापर्यंत सर्वमान्य राहिला आहे. मात्र त्यानंतर त्यात काही बाबतीत आक्षेप घेतले गेले आहेत.