आनुवंशिकता व उत्क्रांती

उत्क्रांतीचे पुरावे

views

4:30
उत्क्रांतीचा सिद्धांत आपण अभ्यासला आहे. मात्र या उत्क्रांतीचे पुरावे काय? हा प्रश्न आपल्याला पडतो. तर आता आपण उत्क्रांतीच्या पुराव्याविषयी माहिती अभ्यासणार आहोत. उत्क्रांती ही सतत होत राहणारी अखंड प्रक्रिया आहे. मात्र हे सिद्ध करण्यासाठी पुराव्याची गरज आहे. त्यासंदर्भात पुढीलप्रमाणे पुरावे स्पष्ट करता येतील. बाह्यरुपीय पुरावे: प्राण्यांच्या तोंडाची रचना, डोळ्यांचे स्थान, नाकपुड्या, कानाची रचना, अंगावरील दाट केस इत्यादी गोष्टींत समानता आढळून येते. तर वनस्पतींमध्ये पानाचा आकार, पानाची रचना, शिराविन्यास, पर्णदेठ इत्यादी गोष्टींत समानता आढळून येते. यावरून आपल्या लक्षात येते की, सजीवांच्या निरनिराळ्या गटांत साम्यस्थळे म्हणजेच सारखेपणा आढळून येतो. यावरून त्यांचा उगम एकाच पूर्वजापासून होऊन त्यांची उत्क्रांती झाली असेल असा अंदाज येतो. हेच बाह्यरुपीय पुरावे आहेत जे सजीवांच्या बाह्य आणि दृश्य स्वरुपात असलेली वैशिष्ट्ये आहेत. शरीरशास्त्रीय पुरावे: मानवाचा हात, मांजरीचा पाय, वटवाघळाचा पंख, देवमाशाचा पर यांमध्ये कोणतेही साम्य नाही. तसेच प्रत्येक प्राण्यामध्ये स्वत:साठी त्यांचा उपयोगही वेगवेगळा आढळून येतो. त्यामुळे त्यांच्या रचनाही भिन्न आहेत. मात्र या प्राण्यांच्या अवयवांतील हाडांच्या रचनेत व हांडांच्या जोडणीमध्ये सारखेपणा आढळून येतो. यावरूनच त्यांचे पूर्वज हे समान असावेत असे निर्देशित होते. अशा प्रकारे आपण उत्क्रांतीच्या पुराव्याविषयी माहिती अभ्यासली आहे.