आनुवंशिकता व उत्क्रांती

प्रतिलेखन, भाषांतरण व स्थानांतरण

views

3:09
आता आपण प्रतिलेखन, भाषांतरण व स्थानांतरण या घटकांविषयी माहिती अभ्यासुया. पेशींच्या कार्यामध्ये डी.एन.ए व आर.एन.ए यांचे कार्य खूप महत्त्वाचे आहे. कारण डी.एन.ए मध्ये असलेली जनुके हे आर.एन.ए. ची मदत घेऊन पेशींच्या कार्यात सहभागी होऊन शरीराच्या रचना व कार्य यांवर नियंत्रण ठेवतात. जनुकांमध्ये प्रथिनांच्या निर्मितीची माहिती साठवली जाते. योग्य प्रथिनांची निर्मिती होणे खूप जरुरी असते. या प्रथिनांची निर्मिती डी.एन.ए मुळे आर.एन.ए च्या माध्यमातून होते. यालाच ‘सेंट्रल डोग्मा’ असे म्हंटले जाते. डी.एन.ए वरील जनुकांच्या साखळीनुसार m- RNA म्हणजेच मॅसेंजर RNA ची निर्मिती होत असते. तयार होणाऱ्या मॅसेंजर RNA(m-RNA) आणि DNA चा धागा या दोन्हींमध्ये असणाऱ्या न्युक्लिओटाइड्सचा क्रम एकमेकांना पूरक असतो. त्याचवेळेस DNA मध्ये असणाऱ्या थायमिनऐवजी मॅसेंजर RNA(m-RNA) मध्ये युरॅसिल असतो. RNA तयार करण्याच्या या प्रक्रियेलाच ‘प्रतिलेखन’ असे म्हणतात.