आनुवंशिकता व उत्क्रांती

उत्परिवर्तन’

views

2:43
आता आपण उत्परिवर्तन म्हणजे काय हे समजून घेऊ. सजीवांमधील जनुकांमुळेच ते त्यांच्यासारखे सजीव निर्माण करतात. यातीलच काही जनुके जशीच्या तशी पुढच्या पिढीमध्ये संक्रमित केली जातात. त्यामुळेच आईवडिलांचे काही गुणधर्म हे त्यांच्या अपत्यात आल्याचे आपल्याला दिसून येते. मात्र काहीवेळेस या जनुकांमध्ये एकदम बदल होतो व जनुकांत असणारे एखादे न्युक्लिओटाइड अचानक आपली जागा बदलते. त्यामुळे जो बदल घडून येतो त्यालाच ‘उत्परिवर्तन’ असे म्हंटले जाते. हेच उत्परिवर्तन कधी कमी प्रमाणात तर कधी एकदम जास्त प्रमाणात घडून येत असते. उदा: उत्परिवर्तनामुळे सिकल सेल अॅनिमियासारख्या जनुकीय विकृती निर्माण होतात. हीच प्रक्रिया अखंडपणे चालते. ही प्रक्रिया डार्विनच्या नैसर्गिक निवडीच्या सिद्धांताचे समर्थन करताना दिसते.