प्रकाश व छायानिर्मिती

प्रकाशाचे संक्रमण

views

3:19
प्रकाशाचे संक्रमण कसे होते ते पाहू. संक्रमण म्हणजे मार्गक्रमण, प्रवास. एखादी बंद खोली असेल. आणि त्या खोलीच्या खिडकीच्या, दरवाजाच्या फटीतून किंवा छताच्या एखाद्या छिद्रातून प्रकाशाची किरणे जमिनीकडे येत असतील तर त्या किरणांचे नीट निरीक्षण केल्यास त्या किरणांच्या मार्गातील धुलिकण स्पष्ट दिसतात. या धूलिकणांच्या मार्गावरूनच आपल्याला समजते की प्रकाशाचा मार्ग एका सरळ रेषेत असतो. प्रकाशाचा मार्ग सरळ रेषेत असतो. प्रकाशाच्या सरळ दिशेतील प्रवासाला प्रकाशाचे रेषीय संक्रमण असे म्हणतात.