प्रकाश व छायानिर्मिती

छाया निर्मिती

views

4:08
कोणत्याही वस्तूची किंवा सजीवाची सावली म्हणजेच तिची छाया. या छायेची निर्मिती कशी होते ते आता आपण पाहू. एक विजेरी म्हणजे टॉर्च घ्या. भिंतीवर त्या विजेरीचा प्रकाश पाडा. आता तुमच्या मित्राला भिंत आणि विजेरी यांच्या मध्ये उभे करा. या भिंतीवर तुमच्या मित्राची सावली पडलेली दिसते आहे. या सावलीला ‘छाया’ असे म्हणतात. यावरून आपल्याला असे म्हणता येईल की, प्रकाश स्रोताच्या मार्गामध्ये अपारदर्शक वस्तू आली, तर त्यातून प्रकाश आरपार जात नाही. त्यामुळे वस्तूच्या पलीकडे असणाऱ्या पृष्ठभागावर वस्तूची सावली पडते. या सावलीलाच त्या ‘वस्तूची छाया’ असे म्हणतात. आणि या प्रक्रियेलाच छाया निर्मिती असे म्हणतात.