प्रकाश व छायानिर्मिती

सूचिछीद्र प्रतिमाग्राहक

views

4:17
सूचिछीद्र प्रतिमाग्राहक हे एक असे उपकरण आहे ज्याला एकच छिद्र असते. बाकी सर्व बाजू बंद असून त्याच्या आत संपूर्ण काळोख असतो. या उपकरणाची संकल्पना समजण्यासाठी आपण एक प्रयोग करू. यासाठी बॅडमिंटनच्या फुलांचा एक डबा घ्या. त्या डब्याच्या एका बाजूचे झाकण काढून त्या जागी पातळ पांढरा कागद चिकटवा. आता दुसऱ्या बाजूच्या झाकणाला मध्यभागी एक बारीक छिद्र पाडा. नंतर मेणबत्ती पेटवून तिची ज्योत छिद्राच्या समोर येईल अशी ठेवा.