पृथ्वीचे अंतरंग

पृथ्वीचे अंतरंग

views

3:23
आता आपण पृथ्वीचे अंतरंग कसे आहे याची माहिती एका प्रयोगाद्वारे घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला एक प्रयोग करायचा आहे. प्रथम बाजारात मिळतात तसे लाल, पिवळया व निळया रंगांचे मातीचे गोळे घ्या. हे गोळे घेताना लाल रंगाचा गोळा थोडा मोठा घ्या. आता पिवळ्या रंगाचा गोळा गोल आकारात लाटून घ्या. त्यानंतर तयार झालेल्या पोळीमध्ये ज्याप्रमाणे पुरणपोळी करताना पोळीत पुरण भरतात त्याचप्रमाणे लाल रंगाचा गोळा त्या पिवळ्या रंगाच्या लाटलेल्या पोळीत भरून घ्या आणि त्याला घनगोलाचा आकार द्या. आता निळ्या रंगाचा गोळा पिवळ्या रंगाप्रमाणे लाटून घ्या. त्यानंतर या पोळीमध्ये पिवळ्या रंगाचा गोळा भरून याचाही घनगोल तयार करून घ्या. हा घनगोल तयार झाल्यानंतर आता पृथ्वीगोलावर जसे खंड दाखविलेले असतात, तसे खंड या घनगोलावर पिवळ्या रंगाने दाखवा. पाहा मुलांनो, पृथ्वीचा गोल तयार झाला आहे. हा पृथ्वीगोल अगदी बरोबर मधून कापला की आपल्याला पृथ्वीचे अंतरंग दिसेल. पृथ्वीच्या अंतरंगाप्रमाणे विविध थर आपल्याला दिसतील. सर्वात वरचा निळ्या रंगाचा थर म्हणजे पृथ्वीचे भूकवच आहे. तर पिवळ्या रंगाचा भाग म्हणजे प्रावरण आहे. अशा तऱ्हेने आपण तयार केलेल्या पृथ्वीगोलाच्या साहाय्याने पृथ्वीच्या अंतरंगातील रचना समजून घेता येईल.