पृथ्वीचे अंतरंग

प्रावरण

views

5:11
प्रावरण :- पृथ्वीचा सर्वात वरचा भाग म्हणजे भूकवच होय. या भूकवचाखाली प्रावरणाचे थर आढळतात. प्रावरणाचे आकृतीत दाखविल्याप्रमाणे उच्च प्रावरण व निम्न प्रावरण असे दोन उपविभाग केले जातात. उच्च प्रावरण हे जास्त प्रवाही असते, म्हणजेच शिलारस या भागात वाहत असतो. याच भागात शिलारस कोठी आढळतात. या उच्च प्रावरणातून ज्यावेळी ज्वालामुखीचा उद्रेक होतो, त्यावेळी हा शिलारस भूपृष्ठावर येतो. प्रावरणाच्या या भागास ‘दुर्बलावरण’ असेही म्हणतात. भूकंपाची केंद्रे प्रामुख्याने याच भागात आढळतात. भूपृष्ठापासून सुमारे ४२ किमी खोलीनंतर प्रावरणास सुरुवात होते. प्रावरणातील अंतर्गत शक्तीमुळे होणाऱ्या हालचालींतून भूपृष्ठावर पर्वत निर्मिती, द्रोणी निर्मिती, ज्वालामुखी, भूकंप यांसारख्या प्रक्रिया घडतात. प्रावरणाची खोली २८७० किमी असावी असा शास्त्रीय अंदाज आहे. या भागात २४०० ते २९०० किमी खोली वरील तापमान २२००० से. ते २५००० से पर्यंत असावे असे अनुमान आहे. या ठिकाणच्या खडकांच्या रचनेत व घनतेत एकाएकी बदल होतो. प्रावरणाची सरासरी घनता ४.५ ग्रॅम/घनसेमी असून खोलीनुसार घनतेत वाढ होत जाते. याचे कारण वाढत जाणारा दाब हे आहे. तर निम्न प्रावरणाची घनता ५.७ ग्रॅम/घनसेमी आहे. अशी प्रावरणाची रचना आढळून येते.