पृथ्वीचे अंतरंग

अंतर्गाभा

views

4:28
अंतर्गाभा म्हणजे पृथ्वीच्या अंतरंगातील सर्वात शेवटचा भाग होय. अंतर्गाभा हा बाह्य गाभ्याखाली असतो. अंतर्गाभा भूपृष्ठाखाली सुमारे ५१५० किमी पासून ६३७१ किमी खोलीपर्यंत (पृथ्वीच्या केंद्रापर्यंत) आढळतो. हा पृथ्वीगर्भाचा केंद्रभाग असून तो घन /स्थायू स्वरूपात आहे. या घनगोलाची घनता सुमारे १३. ३ ग्रॅम/घनसेमी इतकी असते. या थरात काही प्रमाणात लोह व काही प्रमाणात निकेल ही मूलद्रव्ये आढळतात. त्यामुळे त्यास ‘निफे’ असेही म्हणतात. गाभ्यामध्ये या भागातील पदार्थ प्रचंड दाबाखाली असल्याने अंतर्गाभा घनरूप आहे. मुलांनो, पृथ्वीच्या अंतर्गाभ्याचे म्हणजे केंद्राचे तापमान अतिशय जास्त असते. ते साधारणपणे सूर्याच्या पृष्ठीय तापमानाइतके असते. मुलांनो, पृथ्वीच्या अंतरंगात गेल्यास आपले वजन वाढत जाईल. कारण जसजसे पृथ्वीच्या अंतरंगात जाऊ तसतशी घनता वाढत जाते.