पृथ्वीचे अंतरंग

भूकवच

views

5:25
पृथ्वीचा सर्वात वरचा भाग हा घनरूप असून तो भूकवच म्हणून ओळखला जातो. भूकवचाची जाडी सर्वत्र सारखी नाही. खंडीय कवचाची सरासरी जाडी ३० ते ३५ किमी मानली जाते. भूकवचाची खंडाखालील जाडी १६ ते ४५ किमीच्या दरम्यान आहे. तर भूकवचाची ही जाडी पर्वतश्रेणींखाली ४० किमीपेक्षा जास्त असते. तर सागर पृष्ठाखाली ती १० किमीपेक्षा कमी आढळते. भूपृष्ठाकडून भूपृष्ठाखाली जसजसे खोल खोल जावे तसतसे तापमान वाढत जाते. भूपृष्ठाखाली तापमानात वाढ होत जाते. त्यानंतर प्रावरणात तापमानाच्या वाढीच्या प्रमाणात घट होते. म्हणजे तापमान वाढण्याचे प्रमाण कमी होते. पुन्हा गाभा क्षेत्रात तापमानात वाढ होते. पृथ्वीच्या केंद्रस्थानी सुमारे ५५००० से ते ६०००० से. इतके तापमान असते. मुलांनो, तुम्हाला माहीत आहे की, पाणी १००० से. ला उकळते. जर १००० से तापमान असलेले पाणी एवढे गरम असते, तर ६०००० से तापमानाला काय अवस्था होत असेल? म्हणजेच पृथ्वीच्या केंद्रभागी प्रचंड मोठया प्रमाणात उष्णता आहे. भूकवच हे प्रावरण व गाभा यांच्या तुलनेत अतिशय कमी जाडीचे आहे. त्याचे दोन उपविभाग पडतात.