पाणी

सांगा पाहू

views

4:22
मुलांनो, आपल्या प्रत्येकाच्या घरात स्वयंपाकघर (किचन) व न्हाणीघर (बाथरूम) असते. यातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यातून विविध पदार्थ बाहेर पडत असतात. स्वयंपाकघरातून बाहेर पडणाऱ्या पाण्यात भाजी व फळे यांचे अवशेष, खरकटे, तसेच भांडी घासलेले खराब पाणी हे घटक बाहेर पडत असतात. असे पाणी इतरत्र राहिले तर त्यातून रोगराई पसरू शकते. म्हणून अशा पाण्याची विल्हेवाट लावणे गरजेचे असते. ही विल्हेवाट कशी लावावी ते आता आपण पाहू. सांडपाणी आणि त्याची व्हिलेवाट: आपल्या घरातून जसे सांडपाणी घराबाहेर पडते. तसेच आपल्या शहरातील, गावातील प्रत्येक घरातून अशा प्रकारचे सांडपाणी बाहेर पडत असते. हे सर्व सांडपाणी रस्त्याच्या कडेला नाले, गटारे बांधून त्यामार्फत वाहून नेले जाते. त्यानंतर हे सांडपाणी सोईच्या ठिकाणी असलेल्या मोठया जलसाठयात सोडले जाते. मैलापाणी म्हणजे आपल्या शौचालयातून निघणारे सांडपाणी. यात रोग पसरवणारे सूक्ष्मजीव असू शकतात. सूक्ष्मजीव म्हणजे आपल्या डोळ्यांना न दिसणारे अतिशय बारीक जीव होय, तर नद्या, ओढे यातील पाणी वाहते असते. त्यामुळे त्यातील प्रदूषित घटक पाण्याबरोबर वाहत जातात. त्यामुळे नैसर्गिकरीतीनेच या जलस्त्रोतांचे काही प्रमाणात शुद्धीकरण होत असते. तसेच या जलस्त्रोतांमधून गावाला पाणीपुरवठा केला जात असेल, तर तो करण्यापूर्वी त्या पाण्याचे शुद्धीकरणही करण्यात येते.